वृत्तसंस्था, मुंबई
भारतीय लष्कराला अखेर नऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर बुलेटप्रूफ जॅकेट मिळणार आहेत. केंद्र सरकारनं मेक इन इंडिया अंतर्गत 639 कोटींचा करार केला असून याअंतर्गत लष्कराला 1 लाख 86 हजार बुलेटप्रूफ जॅकेट्स उपलब्ध होणार आहेत.
लष्कर गेल्या नऊ वर्षांपासून कारवाईदरम्यान बुलेटप्रूफ जॅकेट मिळावेत. यासाठी प्रयत्न करत होतं. संरक्षण मंत्रालयानं या करारावर सही केली असून यशस्वी ट्रायलनंतरच कराराला अंतिम स्वरुप दिलं जाणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.