Pune Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ भीषण अपघात! 5 ते 6 वाहनं एकमेकांवर आदळली; रिक्षाचा चक्काचूर, चालक गंभीर जखमी
पुणे : पुण्यातील नवले पुलावजवळ भीषण अपघाताची घटना घडली. पुण्यातील नवले पुलाजवळ आज दुपारच्या सुमारास 5 ते 6 वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून घटनास्थळी […]
पुणे : पुण्यातील नवले पुलावजवळ भीषण अपघाताची घटना घडली. पुण्यातील नवले पुलाजवळ आज दुपारच्या सुमारास 5 ते 6 वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. नवले पूल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थापन आणि रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.