Pune Pimpri Chinchwad Crime : गाडी चोरी करू दिली नाही, म्हणून…; पिंपरी चिंचवडमध्ये मध्यरात्री अज्ञाताचा धुमाकूळ, पोलिसांच्या ढिसाळ कारभारावर नागरिक संतप्त

पिंपरी चिंचवडच्या देहूरोड परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. गाडी चोरी करू दिली नाही या रागातून एका अज्ञात इसमाने मध्यरात्री गॅरेजबाहेरील दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

Pune Pimpri Chinchwad Crime : गाडी चोरी करू दिली नाही, म्हणून…; पिंपरी चिंचवडमध्ये मध्यरात्री अज्ञाताचा धुमाकूळ, पोलिसांच्या ढिसाळ कारभारावर नागरिक संतप्त

पिंपरी चिंचवडच्या देहूरोड परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. गाडी चोरी करू दिली नाही या रागातून एका अज्ञात इसमाने मध्यरात्री गॅरेजबाहेरील दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. देहूरोड उड्डाणपुलाखाली असलेल्या 'बबलू गॅरेज' बाहेर ग्राहकांच्या दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकी उभ्या होत्या.

हेही वाचा- Nashik Crime : जुन्या वादाची कुरापत काढली अन् मायलेकीवर कुऱ्हाडीने हल्ला; मुलीच्या शरीरावर गंभीर जखमा, तब्बल 30 टाके, परिसरात खळबळ

यापूर्वी हा अज्ञात आरोपी गॅरेजबाहेरील दुचाकीवर हात साफ करत असताना गॅरेज मालक बबलू गुप्ता यांनी त्याला रंगेहात पकडले होते आणि त्या वेळी त्याला सोडूनही दिले होते. मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून मध्यरात्री नशेत आलेल्या या इसमाने गॅरेजबाहेर पार्क केलेल्या दुचाकी पेटवून दिल्या.घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या आगीत ग्राहकांच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

घटना घडल्यानंतर तक्रार घेऊन गेलेल्या गॅरेज मालकाला केवळ शंकेवरून तात्काळ अटक करता येत नसल्याचे सांगत देहूरोड पोलिसांनी उद्या कारवाई करू असे म्हणून परत पाठवले; मात्र अद्यापपर्यंत आरोपीवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. किंवा पोलिस इथे फिरकले ही नाही. या प्रकरणी संशयित आरोपीला तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे..
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number