Sangli : मध्यरात्री आकाशातून कोसळलं असं काही की, संपूर्ण घर जळून खाक झाले; नेमकं प्रकरण काय?

सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील घोलेश्वर येथे मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली.

Sangli : मध्यरात्री आकाशातून कोसळलं असं काही की, संपूर्ण घर जळून खाक झाले; नेमकं प्रकरण काय?

सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील घोलेश्वर येथे मध्यरात्री वादळी पावसादरम्यान घरावर वीज कोसळून भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अर्जुन ज्ञानेश्वर आटपाडकर यांच्या राहत्या छप्परवजा घर पूर्णतः जळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने घरातील दोघेही जण थोडक्यात बचावल्याने जीवितहानी टळली. घोलेश्वर मध्ये अचानक मध्यरात्रीच्या सुमारास विजांचा कडकडाट व जोरदार पावसाला सुरुवात झाली होती.

हेही वाचा- Mumbai BEST Bus Service: सणासुदीत मुंबईकरांचा आनंद द्विगुणित होणार; गर्दीसाठी ‘बेस्ट’ सेवा सज्ज, 150 जादा बसेस धावणार

याच दरम्यान आटपाडकर यांच्या घरावर अचानक वीज कोसळली. विजेच्या तीव्र तडाख्याने घराला लागलेली आग काही क्षणांतच भडकली आणि संपूर्ण घर जळून खाक झाले. या आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून नष्ट झाले. घटनेच्या वेळी समाबाई ज्ञानेश्वर आटपाडकर या स्वयंपाकासाठी घरात होत्या, तर ज्ञानेश्वर आटपाडकरही घराजवळच होते. मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी तातडीने बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान,संख, अंकलगी या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. झाडे उमळून पडली. तसेच वीजपुरवठा खंडित झाला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number