मुंबई ते गोवा या जलमार्गावरील क्रूझच्या डेकवर टोकाला जाऊन सेल्फी काढल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अमृता फडणवीस यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
“मी एका क्रूझवर होते. मी ज्या जागी बसली होती ती जागा सुरक्षित होती. मी सेल्फी काढायला गेले नव्हते. मी बऱ्याच दिवसांनी शुद्ध हवेचा अनुभव घेत होते,” असे त्यांनी म्हटले आहे. शनिवारी आंग्रीया क्रूझचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. पण या सेल्फीमुळे हा अमृता फडणवीस यांचा सेल्फी चर्चेचा विषय ठरलाय.
अमृता फडणवीस यांना जहाजाच्या पुढे जाऊन सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी काही वेळ जहाजाच्या कडेला थांबून सेल्फी काढला आणि तोपर्यंत पोलिसांना त्यांच्यासाठी तेथेच थांबावे लागले. अमृता फडणवीस यांचा हा सेल्फी घेतानाचा व्हिडिओ सोशल मिडीयात व्हायरल झाला आहे.