Amravati University: विद्यापीठ की दारूचा अड्डा? अमरावतीतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात…

अमरावती विद्यापीठातून मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे.

Amravati University: विद्यापीठ की दारूचा अड्डा? अमरावतीतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात…


 

अमरावती: अमरावती विद्यापीठातून मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे. तेथील विद्यार्थ्यांना मेसमधून निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबरोबर विद्यापीठाच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे.  यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील विद्यार्थ्यांनी याविरुद्ध आंदोलन करत या गोष्टीचा जाहीर निषेध दर्शवला आहे. 

राज्यभरात FDA च्या अनेक कारवाया होत असून सुद्धा अजून एका प्रकारची यात भर पडलेली आहे. यासर्वांवर आळा बसवण्याबबाबत उपाययोजना समोर येत नसून त्याउलट अशा घटना वारंवार होत असल्याचे समोर येत आहे. कालच मुंबई पालिकेच्या कॅन्टीनमध्ये मांजर वावरत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. अशा घटनांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number