Amravati Hospital Fire: ‘माझ्या मुलाला मारून टाकले यांनी’; अमरावतीतील दुर्घटनेत नवजात शिशूचा मृत्यू, वडिलांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात घडलेल्या भीषण दुर्घटनेने तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Amravati Hospital Fire: ‘माझ्या मुलाला मारून टाकले यांनी’; अमरावतीतील दुर्घटनेत नवजात शिशूचा मृत्यू, वडिलांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

अमरावती: अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात पालक आणि नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला.

ज्या कुटुंबांसाठी बाळाचा जन्म हा आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता, त्यांच्यावर काही दिवसांतच दुःखाचा डोंगर कोसळला. मृत बालकांपैकी एका बाळाच्या जन्मानंतर कुटुंबात मोठा आनंद साजरा करण्यात आला होता. मात्र, एका पहाटेने हा सगळा आनंद हिरावून घेतला.

‘बाळ गेल्याचं आईला कसं सांगू?’
आपल्या चिमुकल्याला गमावलेल्या एका वडिलांचा आक्रोश ऐकून रुग्णालयातील वातावरण भावूक झालं. पत्नीला बाळाच्या मृत्यूची बातमी कशी सांगायची आणि तिचं सांत्वन कसं करायचं, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता.

हेही वाचा: Amravati Hospital Fire : अमरावतीत हाहाकार! अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात पहाटेच अग्नितांडव; तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू

वडिलांनी आपली व्यथा मांडताना म्हटलं,

‘आमच्या पिढीतील हे पहिलेच बाळ… आजकाल सिझेरियनचे प्रमाण वाढलेले असताना माझ्या पत्नीची ‘नॉर्मल डिलिव्हरी’ झाली होती. सासरवाडीत मामा झाल्याचा आनंद गगनात मावत नव्हता, गावात उत्साहाने पेढे वाटले गेले. पण, एका भीषण पहाटेने आमचा हा आनंद कायमचा हिरावून घेतला. आमचे बाळ या लाचार आणि बेफिकीर व्यवस्थेने खाल्ले! अजून बायकोला हे सत्य सांगायची हिम्मत होत नाहीये, तिचे सांत्वन करू तरी कसे?’

‘माझ्या मुलाला मारून टाकले यांनी! डॉक्टर-नर्सेस सर्व सुखरूप बाहेर पडले, पण आमची लेकरं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. 

वडिलांच्या या शब्दांतून आपल्या लेकराला गमावल्याचं दुःख आणि व्यवस्थेविरोधातील संताप दोन्ही प्रकर्षाने जाणवत होता. काही दिवसांपूर्वी ज्या घरात बाळाच्या आगमनाचा उत्सव साजरा झाला होता, तिथे आता दुःखाचं सावट आहे.

‘आमचं बाळ जसं आहे तसं परत द्या’
दुर्घटनेनंतर मृत बालकांच्या शवविच्छेदनावरूनही रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला. आपल्या चिमुकल्यांच्या मृत्यूने आधीच कोलमडलेल्या पालकांनी बाळांचं पार्थिव शवविच्छेदन न करता देण्याची विनंती केली

हेही वाचा: Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरमध्ये स्फोट, तरी अलार्म वाजलाच नाही; अमरावती रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची धक्कादायक बाब समोर

पहाटेच्या दुर्घटनेने तीन कुटुंबं उद्ध्वस्त

सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशू अतिदक्षता विभागात आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, व्हेंटिलेटरमध्ये झालेल्या स्फोटानंतर ही आग लागल्याची माहिती आहे. आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचारी आणि वैद्यकीय पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केलं. विभागातील इतर बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. सात बालकांना पुढील उपचारांसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तीन चिमुकल्यांचा जीव वाचवता आला नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number