Mumbai Housing Controversy: ‘तुम्हाला माझ्याशी वाद घालायचा असेल तर मी निघतो!’ अमित ठाकरेंचा पारा चढला, भावेश कावरे म्हणाला…

ताडदेवमधील घराच्या जाहिरातीवरून वाद निर्माण झाल्यानंतर अमित ठाकरेंनी भावेश कावरे यांना सुनावले

Mumbai Housing Controversy: ‘तुम्हाला माझ्याशी वाद घालायचा असेल तर मी निघतो!’ अमित ठाकरेंचा पारा चढला, भावेश कावरे म्हणाला…

मुंबई : मुंबईतील ताडदेव परिसरातील एका घराच्या जाहिरातीवरून निर्माण झालेला वाद चांगलाच चर्चेत आला आहे. घर भाड्याने देताना केवळ शाकाहारी नागरिकांनाच प्राधान्य असल्याचे नमूद करणारी जाहिरात रिअल इस्टेट एजंट भावेश कावरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या जाहिरातीवरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी भावेश कावरे यांची भेट घेत या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

वादग्रस्त जाहिरातीमुळे संताप

ताडदेव येथील एका फ्लॅटसाठी करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये मांसाहारी नागरिकांना घर देण्यात येणार नसल्याचे नमूद करण्यात आले होते. केवळ शाकाहारी नागरिकांसाठी घर उपलब्ध असल्याच्या या उल्लेखामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आक्षेप घेतला.मुंबईसारख्या विविध भाषा, धर्म आणि खाद्यसंस्कृती असलेल्या शहरात घर भाड्याने देताना अशा पद्धतीने भेदभाव करणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. प्रकरण वाढल्यानंतर भावेश कावरे यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही सोशल मीडियावरील नाराजी कमी झाली नाही.

अमित ठाकरे भावेश कावरे यांच्यावर संतापले

या वादानंतर भावेश कावरे यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अमित ठाकरे यांनी जाहिरातीवरून कावरे यांना स्पष्ट शब्दांत सुनावल्याचे समोर आले आहे.“ही बिल्डिंग फक्त शाकाहारी लोकांसाठी आहे, असं तुम्ही कोणत्या आधारावर सांगितलं? यावर तुम्हाला माझ्याशी वाद घालायचा असेल तर मी निघतो,” अशा शब्दांत अमित ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.मुंबईतील नागरिक सध्या शहरातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देत आहेत. अशा परिस्थितीत लोकांमध्ये भेदभाव निर्माण करणारे मुद्दे पुढे करून त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे काम का केले जात आहे, असा सवालही अमित ठाकरे यांनी केल्याची माहिती आहे.केवळ प्रसिद्धी किंवा आर्थिक फायद्यासाठी अशा प्रकारचे वाद निर्माण करू नका, असा सल्ला देतानाच या जाहिरातीमुळे मुंबईकरांच्या भावना दुखावल्या गेल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले. कोणतेही कारण न देता सर्वांची माफी मागावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतल्याचे समोर आले आहे.

भावेश कावरे यांनी मागितली माफी

अमित ठाकरे यांच्या भेटीनंतर भावेश कावरे यांनी माध्यमांसमोर येत या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. या जाहिरातीमुळे एवढा मोठा वाद निर्माण होईल, अशी अपेक्षा नव्हती, असे त्यांनी सांगितले.“मी मुंबईकरांची तसेच मनसे आणि अमित ठाकरे यांची माफी मागतो. मला हा वाद पुढे वाढवायचा नाही. माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल माफी मागतो,” अशी भूमिका भावेश कावरे यांनी मांडली.तसेच मराठी नागरिकांना घर देत असून भविष्यातही मराठी माणसांना घर देत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number