Mumbai Mazgaon : बाप्पाच्या आगमनावेळी मुंबईत दोन गटात राडा! मूर्तीवर अंडी फेकली? नेमकं प्रकरण काय?

'भुलेश्वरचा राजा'ची 22 फूट उंच मूर्ती कोसळल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. माझगाव परिसरात गणपती आगमनावेळी दोन गटात जोरदार वाद झाला.

Mumbai Mazgaon : बाप्पाच्या आगमनावेळी मुंबईत दोन गटात राडा! मूर्तीवर अंडी फेकली? नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील विविध गणेश मंडळांचे राजे-महाराजे आपापल्या मंडपांमध्ये दाखल होत असताना आणि संपूर्ण मुंबापुरीला गणरायाच्या उत्सवाचे वेध लागले असताना शनिवारी अघटित घडले. मुंबईतील भुलेश्वर परिसरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळून एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. मुंबईतील माझगाव परिसरात 23 ऑगस्ट रोजी गणपती आगमनावेळी दोन गटात जोरदार वाद झाला या वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

हेही वाचा- Ashish Shelar On Bhuleshwar cha Raja Accident : भुलेश्वरच्या राजाची भव्य मूर्ती कोसळली! दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी; आशिष शेलारांची मोठी घोषणा

आगमनादरम्यान मूर्तीवर अंडी फेकली?
मुंबईतील माझगाव परिसरामध्ये गणपती आगमनावेळी मूर्तीवर अंडी फेकल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतप्त गणेश मंडळाचे कार्यकर्ते, आगमनाला उपस्थित तरुण आणि गणेशभक्तांनी रात्री आंदोलन करत निषेध व्यक्त केला. या घटनेमुळे मध्यरात्री 3 वाजेपर्यंत माझगावमध्ये दोन गटात तणाव पाहायला मिळाला. यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. माझगाव परिसरामध्ये गणपती आगमनावेळी कॉन्टिनेन्टल हाइट्स या इमारतीतून मूर्तीवर आणि मिरवणुकीत उपस्थित असलेल्यांवर अंडी फेकण्यात आल्याचा आरोप गणेश मंडळ आणि भक्तांकडून करण्यात आला. हा प्रकार काल रात्री 10 वाजता घडला, त्यानंतर दोन गटात तणाव निर्माण झाला आणि घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

पोलिसांकडून तपास सुरु
यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. माजगाव परिसरात सध्या पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच माझगावमध्ये गणेश मूर्ती आगमन मिरवणुक राडा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अंडी नेमकी कोणी आणि कुठून फेकली, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हेही वाचा- Bhuleshwarcha Raja Accident: दक्षिण मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन मिरवणुकीत अपघात; 22 फुटी गणेशमूर्ती कोसळण्यामागे हे कारण?

भुलेश्वरच्या राजाची भव्य मूर्ती कोसळली
शनिवारी मुंबईतील भुलेश्वरचा राजा (Bhuleshwar Cha Ganpati 2026) आपल्या मंडपात विराजमान होण्यापूर्वीच मोठं विघ्न कोसळलं. बाप्पाच्या आगमनादरम्यान भुलेश्वरच्या गणपतीची 22 फूट उंच मूर्तीचा तोल जाऊन मूर्ती कोसळली. यात पाच जण जखमी झाले असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान मंडपापासून 50-60 मीटर अंतरावर अचानक मूर्ती कोसळल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी रस्त्यावर कोणतेही खड्डे दिसत नसून प्राथमिक तपासानुसार, तोल गेल्यामुळे ही घटना घडली असावी असे म्हटले जात आहे. या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि पदाधिकारी बृजेश जोशी हे दोघे ठार झाले असून, अन्य पाच जण जखमी आहेत. दरम्यान भुलेश्वर गणपती दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत तर जखमींना एक लाख रुपयाची मदत देण्यात येणार असल्याचे घोषणा सरकारने केली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number