मंत्रालयासमोरील बंगला अजित पवारांचं नवं कार्यालय

मुंबई, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच, पक्ष आणि चिन्ह आमच्याबरोबर आहे असं म्हणत अजित पवारांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलंय. मात्र त्याचवेळी शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, हे विसरलात का, असा प्रश्नही अजित पवारांनी या पत्रकार परिषदेत केला. आता अजित पवार यांनी पक्षाचं नवं कार्यालय देखील घेतलं आहे. […]

मंत्रालयासमोरील बंगला अजित पवारांचं नवं कार्यालय

मुंबई, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच, पक्ष आणि चिन्ह आमच्याबरोबर आहे असं म्हणत अजित पवारांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलंय. मात्र त्याचवेळी शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, हे विसरलात का, असा प्रश्नही अजित पवारांनी या पत्रकार परिषदेत केला. आता अजित पवार यांनी पक्षाचं नवं कार्यालय देखील घेतलं आहे. मंत्रालय समोर A/5 बंगला अजित पवारांचं आता नवं कार्यालय असेल. उद्या म्हणजे मंगळवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं मुंबईत उदघाटन होणार आहे. दुपारी एक वाजता अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे.

मुंबईच्या चर्चगेटमध्ये असलेलं वाय बी चव्हाण सेंटर महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र मानलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्हाय बी चव्हाण सेंटरमधून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता व्हाय बी चव्हाण सेंटरपासून जवळच अजित पवारांचं नवं पक्ष कार्यालय असणार आहे. शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यापासून त्यानंतर घडलेल्या सर्व घडामोडींचा साक्षीदार हे वायबी चव्हाण सेंटर आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेस सरकार मध्ये सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडणार आहे. ही बैठक सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यामुळे सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ५ जुलै रोजी पार पडणार आहे. त्याचसंदर्भात चर्चा करण्यासाठी सकाळी अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. बोलवण्यात आली आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number