अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करून आरोपी फरार झाल्याची माहितीदेखील समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास आता पोलिस करत आहेत.
ही घटना संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शाळेत घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील इयत्ता सहावी मध्ये शिकणारी ही अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. यावेळी अचानक तिच्या समोर येऊन अज्ञात एका युवकाने तिच्या चेहऱ्यावरती अॅसिड फेकले.
हेही वाचा – Crime News : धक्कादायक! सुट्टी नाकारल्याने बँक मॅनेजरची गोळी झाडून हत्या
मुलीने आरडाओरड केल्यानंतर आसपासचे नागरिक गोळा झाले. या घटनेची माहिती पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले आहे. यानंतर अल्पवयीन मुलीला उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले आहे. दरम्यानं, फरार असलेल्या आरोपीचा तपास पोलिस करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.