वर्सोवा बीचवर मुंबईकरांसाठी कासव फेस्टिव्हलची पर्वणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सध्या रत्नागिरीतील अंजर्लेत कासव फेस्टिव्हल सुरु आहे. अशा कासव फेस्टिव्हलना हजेरी लावण्याची अनेकांची इच्छा असते. मुंबईकरांना तर आपल्या घाई-गर्दीच्या वेळेतून असे फेस्टिव्हल अनेकदा अनुभवायसही मिळत नाही. मात्र, वर्सोवा बीचवर कासवांची जवळपास 80 पिल्ले दिसली. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना ऐनवेळी कासव फेस्टिव्हलचा अनुभव घेता आला. गुरुवारी सकाळी मुंबईच्या वर्सोवा बीचवर स्वच्छतादूत […]

वर्सोवा बीचवर मुंबईकरांसाठी कासव फेस्टिव्हलची पर्वणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सध्या रत्नागिरीतील अंजर्लेत कासव फेस्टिव्हल सुरु आहे. अशा कासव फेस्टिव्हलना हजेरी लावण्याची अनेकांची इच्छा असते. मुंबईकरांना तर आपल्या घाई-गर्दीच्या वेळेतून असे फेस्टिव्हल अनेकदा अनुभवायसही मिळत नाही. मात्र, वर्सोवा बीचवर कासवांची जवळपास 80 पिल्ले दिसली. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना ऐनवेळी कासव फेस्टिव्हलचा अनुभव घेता आला.

गुरुवारी सकाळी मुंबईच्या वर्सोवा बीचवर स्वच्छतादूत अफरोझ शाह आणि त्यांचे काही सहकारी फिरत असताना सकाळी 10 च्या आसपास त्यांना कासवांची पिल्ले दिसले. अफरोझ शाह यांनी तातडीने पर्यावरण अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. मुंबईच्या सागरी किनाऱ्यावर खूप वर्षांनी अशा प्रकारे इतक्या संख्येने कासव दिसले.

मुंबईच्या सागरी किनाऱ्यावर ओलिव्ह रिडेल आणि ग्रीन सी टर्टल प्रजातीची कासवे सापडतात. वर्सोवा सागरी किनाऱ्यावर सापडलेली पिल्ले ओलिव्ह रिडेल प्रजातीची आहेत. या पिल्लांच्या कवचाचा रंग फिकट गुलाबी हिरवा असतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number