मच्छीमारांच्या उपजिविकेवर घाला

दिवाळे, मोहा, नाव्हा गावातील मच्छिमारांना महाराष्ट्र प्रादेशिक बंदर विभागाने मासेमारी करण्यासाठी टाकण्यात येणारे जाळे न टाकण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे. मुंबई ते नवी मुंबई प्रवास जलद आणि सुखकर व्हावा यासाठी जलवाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र ही जलवाहतूक नवी मुंबई, उरण परिसरातील स्थानिक मच्छिमारांच्या उपजिवीकेवर घाला घालत आहे. यामुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये संतापाची लाट उसळली असून […]

मच्छीमारांच्या उपजिविकेवर घाला

दिवाळे, मोहा, नाव्हा गावातील मच्छिमारांना महाराष्ट्र प्रादेशिक बंदर विभागाने मासेमारी करण्यासाठी टाकण्यात येणारे जाळे न टाकण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे. मुंबई ते नवी मुंबई प्रवास जलद आणि सुखकर व्हावा यासाठी जलवाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र ही जलवाहतूक नवी मुंबई, उरण परिसरातील स्थानिक मच्छिमारांच्या उपजिवीकेवर घाला घालत आहे.

यामुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये संतापाची लाट उसळली असून नोटीस मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे. एकट्या दिवाळे गावात २२५ नोंदणीकृत मच्छिमार सदस्य असून ते बेलापूर ते भाऊचा धक्का या भागात मासेमारी करत आपली उपजीविका करत आहेत. जाळे टाकण्यास मनाई केल्यास पारंपरिक उत्पन्नाच साधन बंद पडणार असून हा प्रश्न त्वरित सोडवण्याची मागणी मच्छिमार बांधवांनी केली आहे. परंतु जाळ टाकल्यास कायदेशीर कारवाई करण्याची ताकीद या पत्रात देण्यात आले आहे.

चॅनल बनवताना मच्छिमारांना विश्वासात घेतले नाही. यासोबातच जलमार्गात या मच्छिमारांच्या जाळ्यांचा कुठलाही अडथळा येत नसताना देखिक नोटीस बजावण्यात आल्याने या प्रकरणी अधिवेशनात आवाज उचलणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली आहे.

स्थानिक मच्छिमारांची जामीन गेली आता त्यांच्या पारंपरिक मासे विक्री व्यवसायावर देखील घाला घालण्यात येत असेल तर मच्छिमारांनी आपला उदरनिर्वाह कसरायचा कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number