Mumbai Crime : ‘सिरियल कॅट किलर’ अखेर अटकेत! तब्बल 20 मांजरांचा केला होता निर्घृण खून; आरोपीवर होतं 50 हजाराचं बक्षीस

मुंबई : गोवंडीच्या पांजरापोळ येथील शनी मंदिराजवळ भटक्या मांजरी आणि तिच्या निरागस पिल्लाची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. आता या प्रकरणात आरसीएफ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रुबीना पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना आरसीएफ पोलिसांनी मांजरांची हत्या करणाऱ्या आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. त्याचे […]

Mumbai Crime : ‘सिरियल कॅट किलर’ अखेर अटकेत! तब्बल 20 मांजरांचा केला होता निर्घृण खून; आरोपीवर होतं 50 हजाराचं बक्षीस

मुंबई : गोवंडीच्या पांजरापोळ येथील शनी मंदिराजवळ भटक्या मांजरी आणि तिच्या निरागस पिल्लाची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. आता या प्रकरणात आरसीएफ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रुबीना पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना आरसीएफ पोलिसांनी मांजरांची हत्या करणाऱ्या आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. त्याचे नाव शिवा असे असून तो गर्दुला आहे. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र हा गुन्हा नेमका कोणत्या कारणातून केला? त्यामागे विकृती आहे की आणखी काही? याचा अधिक सखोल तपास पोलीस करत आहेत. यासाठी तांत्रिक पुरावे (CCTV, इतर साक्ष) हस्तगत करण्याकरता पोलिसांनी आज, शनिवारी आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

हेही वाचा : Manoj Jarange Patil : मुंबईच्या दिशेने मराठ्यांचं भगवं वादळ! मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, आता पुढे काय?

काही दिवसांपूर्वी चेंबूर येथील पांजरापोळ परिसरात सुमारे 20 मांजरांची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे प्राणिप्रेमींमध्ये तीव्र संताप उफाळला होती. तसेच मुंबई पोलीस 'सिरियल कॅट किलर'चा शोध घेत होते. दरम्यान, या क्रूर कृत्यातील आरोपीचा शोध घेण्यास आणि त्याला अटक करण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीला 'पेटा इंडिया' या संस्थेने 50 हजार रुपयांचं बक्षीसदेखील जाहीर केले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number