Muktainagar Road Accident : भीषण अपघात! चालकाचा अंदाज चुकल्याने बोलेरो वाहन रस्त्यावर उलटली; चार भाविकांची प्रकृती गंभीर

जुगल पाटील, जळगाव  मुक्ताईनगर : श्रावण मासानिमित्त तापी-पूर्णा संगमावरून कावड यात्रेचे पवित्र तीर्थ घेऊन खामगावकडे परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरो वाहनाचा जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव गावाजवळ भीषण अपघात झाला. चालकाचा अंदाज चुकल्याने बोलेरो वाहन रस्त्यावर उलटली. ज्यामध्ये भाविक जखमी झाले असून त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. ​अपघाताची माहिती मिळताच चांगदेवचे येथील सरपंच पंकज कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ […]

Muktainagar Road Accident : भीषण अपघात! चालकाचा अंदाज चुकल्याने बोलेरो वाहन रस्त्यावर उलटली; चार भाविकांची प्रकृती गंभीर

जुगल पाटील, जळगाव 

मुक्ताईनगर : श्रावण मासानिमित्त तापी-पूर्णा संगमावरून कावड यात्रेचे पवित्र तीर्थ घेऊन खामगावकडे परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरो वाहनाचा जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव गावाजवळ भीषण अपघात झाला. चालकाचा अंदाज चुकल्याने बोलेरो वाहन रस्त्यावर उलटली. ज्यामध्ये भाविक जखमी झाले असून त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. ​अपघाताची माहिती मिळताच चांगदेवचे येथील सरपंच पंकज कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त भाविकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी नगरसेवक प्रशांत टोंगे, वसंत भलभले आणि माजी नगरसेवक निलेश शिरसाठ यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देत मदतकार्य राबवले. ​गंभीर जखमी झालेल्या चार भाविकांना प्राथमिक उपचारानंतर तात्काळ पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर उर्वरित जखमींवर मुक्ताईनगर उपजिल्हारुग्णालयात उपचार सुरू आहे.

हेही वाचा : Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द, नगरविकास विभागाकडून अधिसूचना जारी; सहा वर्षे निवडणूक लढविण्यासही बंदी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number