Yeola: कचऱ्यात आधार, पॅन अन् मतदान कार्डांचा ढीग; येवला-नागडे रोडवर नेमकं काय घडलं?

येवला-नागडे रोडवरील नागडा चौक परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आधार, पॅन आणि मतदान ओळखपत्रे आढळल्याने खळबळ उडाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात कागदपत्रे येथे कशी आली, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Yeola: कचऱ्यात आधार, पॅन अन् मतदान कार्डांचा ढीग; येवला-नागडे रोडवर नेमकं काय घडलं?

येवला: येवला-नागडे रोडवरील नागडा चौक परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची महत्त्वाची ओळखपत्रे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्रे अशा स्वरूपातील कागदपत्रे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेली स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली.

नागडा रेल्वे गेटच्या अलीकडे असलेल्या चौफुलीजवळ हा प्रकार समोर आला. एकाच ठिकाणी अनेक नागरिकांची वैयक्तिक कागदपत्रे आढळल्याने हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत परिसरात चर्चा सुरू झाली आहे. ही कागदपत्रे संबंधित नागरिकांनी टाकली आहेत की एखाद्या कार्यालयातून किंवा इतर ठिकाणाहून ती येथे आणून टाकण्यात आली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

हेही वाचा: Digital Arrest : डिजिटल अरेस्टच्या दोन घटनांमध्ये 79 लाखांचा गंडा; बनावट अटक वॉरंट, जप्तीचे आदेश, कागदपत्रे पाठवून फसवणूक

आधार, पॅन आणि मतदान ओळखपत्रांमध्ये नागरिकांची वैयक्तिक माहिती असते. त्यामुळे अशी कागदपत्रे उघड्यावर आणि कचऱ्यात आढळणे हा गंभीर प्रकार मानला जात आहे. या कागदपत्रांचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कचऱ्यात सापडलेल्या ओळखपत्रांमधील नागरिकांची माहिती नेमकी कुठून आली, त्यामागे कोणाचा सहभाग आहे आणि ही कागदपत्रे अशा प्रकारे का टाकण्यात आली, याचा शोध घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून कागदपत्रे सुरक्षित ताब्यात घ्यावीत आणि संबंधित नागरिकांपर्यंत ती पोहोचवण्याची कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Crime News: वसतिगृहातील कारवाईचा सूड अन् पैशांची हाव; 10 वीच्या 2 विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकेला 27 वेळा चाकूने वार करून संपवलं

या घटनेमुळे नागरिकांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या तपासानंतर या प्रकारामागचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number