Nashik Crime : नाशिक हादरलं! आधी डोक्यात कोयत्याने वार नतंर दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं; व्हिडीओ शूटिंगच्या वादातून युवकाचा मृत्यू

नाशिक : नाशिकच्या विल्होळीत मुलीसोबत बोलण्याचा व्हिडीओ काढल्याच्या रागातून रक्तरंजित थराराची घटना घडली आहे. राहुल संजय सरकटे या ३० वर्षीय युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून दुसऱ्या मजल्यावरून फेकल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी राहुलचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, राहुलवर हल्ला करणाऱ्या अजय गांगुर्डे, वैभव मेंगाळसह […]

Nashik Crime : नाशिक हादरलं! आधी डोक्यात कोयत्याने वार नतंर दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं; व्हिडीओ शूटिंगच्या वादातून युवकाचा मृत्यू

नाशिक : नाशिकच्या विल्होळीत मुलीसोबत बोलण्याचा व्हिडीओ काढल्याच्या रागातून रक्तरंजित थराराची घटना घडली आहे. राहुल संजय सरकटे या ३० वर्षीय युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून दुसऱ्या मजल्यावरून फेकल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी राहुलचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, राहुलवर हल्ला करणाऱ्या अजय गांगुर्डे, वैभव मेंगाळसह तिन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हल्ल्यानंतर संशयितांनी पिकअप घेऊन घटनास्थळावरून पलायन केले होते. नाशिक तालुका पोलिसांकडून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हेही वाचा : Nagpur Crime : प्रेमकहाणीचा भयंकर अंत! अचानक रात्री हॉटेलच्या 302 रूममधून तरुणीच्या किंकाळ्या, दार उघडताच समोर दिसलं…; बंद रूममध्ये नेमकं काय घडलं?

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत त्याच्या कुटुंबीयांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात आंदोलन केले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रात्री साडेदहाच्या सुमारास राहुलवर हल्ला करण्यात आला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि आरोपींवर त्वरित तसेच कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. मृत राहुलच्या भावाने प्रतिक्रिया देताना सांगितले की, “त्यांनी माझ्या भावाची हत्या केली, चौघांनी मिळून माझ्या भावाची हत्या केली. आम्ही न्यायाच्या मागणीसाठी इथे आलो आहोत.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number