लातूर : परळीहून लातूरमध्ये आलेल्या 4 मित्रांमध्ये हॉटेलमध्ये जेवताना पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादातून बाबा आली शेख या तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना लातूर शहरातील उस्मानपुरा भागात घडली आहे. आरोपीमध्ये परळीचा नगरसेवक खालील शेख याचा समावेश असून घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले लातूर शहरात उपस्थित असताना […]
लातूर : परळीहून लातूरमध्ये आलेल्या 4 मित्रांमध्ये हॉटेलमध्ये जेवताना पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादातून बाबा आली शेख या तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना लातूर शहरातील उस्मानपुरा भागात घडली आहे. आरोपीमध्ये परळीचा नगरसेवक खालील शेख याचा समावेश असून घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले लातूर शहरात उपस्थित असताना तसेच पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना भररस्त्यात तरुणाचा खून झाल्याने लातूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.