Baramati Crime : बारामती हादरली! शिक्षणासाठी सूर्यनगरीत आलेल्या युवकाने डोक्यात झाडली पिस्तुलाची गोळी; एका संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात

बारामती : बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूर्यनगरीत एका युवकाने डोक्यात रिवॉल्वरमधून गोळी झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अविष्कार ढोले असे या युवकाचे नाव आहे. यामध्ये युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी एमआयडीसी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तो युवक गंभीर जखमी असल्या कारणाने त्याला डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी पुणे […]

Baramati Crime : बारामती हादरली! शिक्षणासाठी सूर्यनगरीत आलेल्या युवकाने डोक्यात झाडली पिस्तुलाची गोळी; एका संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात

बारामती : बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूर्यनगरीत एका युवकाने डोक्यात रिवॉल्वरमधून गोळी झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अविष्कार ढोले असे या युवकाचे नाव आहे. यामध्ये युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी एमआयडीसी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तो युवक गंभीर जखमी असल्या कारणाने त्याला डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली आहे. हा युवक शिक्षणासाठी सूर्यनगरीतील एका अपार्टमेंटमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. याच अपार्टमेंटमध्ये डोक्यात गोळी झाडून घेतल्याची माहिती आहे. त्याच्याकडे रिवॉल्वर कुठून आली, याचा तपास पोलीस घेत आहेत. या घटनेचे नेमके कारण काय हे मात्र अद्याप समजले नाही. यात पोलिसांकडूं संशयित एकाला ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.

हेही वाचा : Crime : हॉटेलमध्ये गेली अन् तो आला; 40 मिनिटांनी घडलेल्या प्रकाराने प्रत्येकजण हादरला; रुम नंबर 101 मध्ये ब्युटीशियनसोबत घडलं काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number