Baramati Accident : भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले, बाईक घसरली, भरधाव वाहनाने तिघांना उडवलं; एकाचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी

बारामती : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव आनंदात साजरा झाला. मात्र पुण्याच्या दिवेघाटात दुर्दैवी घटना घडली. दहीहंडी उत्सवासाठी बारामतीकडून पुण्याच्या दिशेने दुचाकीवरून निघालेल्या तीन तरुणांचा दिवे घाटात शनिवारी अपघात झाला. दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती रस्त्यावर घसरली. यामध्ये तिघेही खाली पडले. याचवेळी मागून येणाऱ्या वाहनाच्या चाकाखाली एक तरुण आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले. या अपघातात बारामतीतील 18 वर्षीय गौरव […]

Baramati Accident : भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले, बाईक घसरली, भरधाव वाहनाने तिघांना उडवलं; एकाचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी

बारामती : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव आनंदात साजरा झाला. मात्र पुण्याच्या दिवेघाटात दुर्दैवी घटना घडली. दहीहंडी उत्सवासाठी बारामतीकडून पुण्याच्या दिशेने दुचाकीवरून निघालेल्या तीन तरुणांचा दिवे घाटात शनिवारी अपघात झाला. दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती रस्त्यावर घसरली. यामध्ये तिघेही खाली पडले. याचवेळी मागून येणाऱ्या वाहनाच्या चाकाखाली एक तरुण आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले. या अपघातात बारामतीतील 18 वर्षीय गौरव चव्हाण याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य दोन तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. पुण्याच्या दहीहंडीसाठी जात असताना झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे बारामतीत हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्सवाचा आनंद साजरा करताना दुचाकी चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणं, हेल्मेटचा वापर करणं आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव या घटनेनं पुन्हा करून दिली आहे.

हेही वाचा : Navi Mumbai : धक्कादायक! सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने लॉजमध्ये घेतला गळफास; 8 पानी नोट, अखेरचा व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number