पुण्याच्या पोलीस स्थानकात महिलेचा तमाशा

पोलीस ठाण्यात आलेल्या तरूणीने आरडा-ओरडा करत महिला कर्मचाऱ्यांना मारहाण करत गोंधळ घातल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी २१ वर्षीय तुरूणीवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी कर्वेनगर पोलीस ठाण्यात तरुणीविरोधात गुन्हा नोंदविल्याप्रकरणी त्या तरुणीने पोलीस चौकीत गोंधळ घातला असल्याचे पोलीस ठाण्यातू समजले. त्यामुळे पोलिसांनी त्या तरुणीला समजावत मुलीस वारजे चौकीत […]

पुण्याच्या पोलीस स्थानकात महिलेचा तमाशा

पोलीस ठाण्यात आलेल्या तरूणीने आरडा-ओरडा करत महिला कर्मचाऱ्यांना मारहाण करत गोंधळ घातल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी २१ वर्षीय तुरूणीवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी दुपारी कर्वेनगर पोलीस ठाण्यात तरुणीविरोधात गुन्हा नोंदविल्याप्रकरणी त्या तरुणीने पोलीस चौकीत गोंधळ घातला असल्याचे पोलीस ठाण्यातू समजले. त्यामुळे पोलिसांनी त्या तरुणीला समजावत मुलीस वारजे चौकीत आणले आणि त्या तरुणीची तक्रार दाखल करून घेतली. परंतु पुन्हा ही तरुणी कर्वेनगर चोकीत गेली आणि गोंधळ घालण्यास सुरूवात केली. पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल गोंधळ घालत असताना तक्रारदार महिला कर्मचाऱ्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या तरुणीने महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण झटापट केली. पोलीस चौकीत आरडा-ओरड कतरत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यामुळे त्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number