मध्य प्रदेशाच्या सीहोर कुबेरेश्वर धाम येथे सुरू असलेल्या रुद्राक्ष महोत्सवात गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली. यात मालेगावच्या मंगला कांडेकर यांचा मृत्यू झाला. त्या मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील रहिवासी आहेत. गर्दीत भोवळ आल्याने त्यांचा मृत्यू झाला. रुद्राक्ष घेण्यासाठी मालेगावातून हजारोंच्या संख्येने भाविक कुबेरेश्वर धामला गेले होते.मंगला कांडेकर असे या महिलेचे नवा आहे. रुद्राक्ष घेण्यासाठी मालेगावातून हजारोच्या संख्येने भाविक गेले आहे कुबेरेश्वर धामला पोहोचले होते.
अजूनही रुद्राक्ष महोत्सवासाठी लोक जात आहेत. बुलडाण्याच्या खामगाव इथल्या तीन महिल्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. नातेवाईकांनी ही तक्रार दाखल केली असून आता या प्रकरणी महिलांचा शोध सुरू आहे.
सिहोर इथे रुद्राक्ष महोत्सव सुरू आहे. इथे मोफत रुद्राक्ष वाटले जात आहे. ते घेण्यासाठी देशभरातून हजारो भाविक इथे पोहोचले आहेत. सिहोरला जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास ३० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच आहेत. तर रेल्वे स्थानकातही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे.
गुरुवारी सकाळची कुबेरेश्वर धाम ते इछावर रोडपर्यंत १७ किमी लांबीचा जाम होता. सीहोर ते इंदूरच्या दिशेने २७ किमी व भोपाळच्या दिशेने १० किमी लांबीच्या महामार्गावरही जाम होता. गर्दीमुळे मोबाईल नेटवर्कवरही ताण आला होता. पोलिस व प्रशासनाच्या टीम व्यतिरिक्त आरएसएस, बजरंग दल, स्थानिक लोक, समिती सदस्य असे एकूण १५,००० लोक व्यवस्था सांभाळत आहेत. कथा पंडाल, अन्न पंडाल, रुद्राक्ष वितरण केंद्र येथे त्यांची ड्युटी लावण्यात आली होती.