Beed Accident : तिसगाव-शेवगाव रस्त्यावर भीषण अपघात, भरधाव वाहनाची बैलगाड्यांना धडक; 14 ऊसतोड कामगार जखमी

गुरुवारी पहाटे तिसगाव-शेवगाव रस्त्यावर एका सुसाट वाहनाने ऊसतोड कामगारांच्या बैलगाड्यांना जोरदार धडक दिली.
Beed Accident : तिसगाव-शेवगाव रस्त्यावर भीषण अपघात, भरधाव वाहनाची बैलगाड्यांना धडक; 14 ऊसतोड कामगार जखमी

Beed Accident :  ऊस कापणीच्या हंगामात पोटाची खळगी भरण्यासाठी निघालेल्या ऊसतोडणी कामगारांवर काळाने भीषण घाला घातला आहे. गुरुवारी पहाटे तिसगाव-शेवगाव रस्त्यावर एका सुसाट वाहनाने ऊसतोड कामगारांच्या बैलगाड्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 14 कामगार रक्तबंबाळ झाले असून, एका बैलाला आपला जीव गमवावा लागला आहे. आष्टी तालुक्यातील शेंडगेवाडी (सावरगाव गड) येथील ऊसतोड कामगारांचा तांडा आपल्या बैलगाड्यांसह वृद्धेश्वर साखर कारखान्याकडे (पिंपळगाव कासार) निघाला होता. पहाटे 6 च्या सुमारास, रस्ता शांत असताना समोरून येणाऱ्या एका अनियंत्रित वाहनाने विरुद्ध दिशेला असलेल्या बैलगाड्यांना अक्षरशः चिरडले. ही धडक इतकी जबरदस्त होती की, बैलगाड्या सुमारे 200 फूट अंतरापर्यंत फरफटत गेल्या. यामध्ये एक बैल जागीच ठार झाला, तर पाच बैल गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा – Prashant Jagtap : नव्या वाटेवरचा जुना खेळाडू ! प्रशांत जगताप आज 'या' पक्षात करणार अधिकृत प्रवेश

दोन जणांची प्रकृती चिंताजनक

या दुर्घटनेत एकूण 14 जण जखमी झाले असून, त्यापैकी पूजा शेंडगे (30) आणि शरद शेंडगे (40) या दोघांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील 'इंपल्स हॉस्पिटल'मध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. इतर 12 जखमींवर तिसगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असून, अनेकांना गंभीर फ्रॅक्चर झाले आहेत.

हेही वाचा – 31st December Party Rules: तळीरामांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरला मद्यविक्रीसाठी विशेष मुभा; पाहा तुमच्या शहरातील नवी वेळ

आमदार सुरेश धस यांची घटनास्थळी धाव

दरम्यान, अपघाताची माहिती समजताच आमदार सुरेश धस यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्यात मदत केली. त्यांनी पोलीस प्रशासनाला पाचारण करून जखमींसाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था केली. रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांनी डॉक्टरांना योग्य उपचारांच्या सूचना दिल्या. तसेच, ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना आधार दिला.

दोषी चालकावर कारवाईची मागणी

तथापी, पाथर्डी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून फरार किंवा दोषी वाहनचालकाचा शोध सुरू आहे. गोरगरीब ऊसतोड कामगारांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या दोषी चालकावर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार धस यांनी केली आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version