Stray Dog In Wardha : वर्ध्यातही भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; 19 जणांचा चावा, नागरिकांमध्ये भीती

वर्धा : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. कल्याम, छत्रपती संभाजीनगर येथील भटक्या कुत्र्यांनी चावा घेण्याच्या आकडेवारी समोर आल्यानंतर काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये चिमुकल्यांना कुत्र्यांनी लक्ष केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याचे दिसून आले. दरम्यान, वर्ध्यातही भटक्या कुत्र्याची दहशत पाहायला मिळत असून आतापर्यंत भटक्या कुत्र्यांनी तब्बल 19 जणांना चावा घेतला आहे. भटक्या कुत्र्याने चावा घेतलेल्या जखमीवर जिल्हा […]

Stray Dog In Wardha : वर्ध्यातही भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; 19 जणांचा चावा, नागरिकांमध्ये भीती

वर्धा : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. कल्याम, छत्रपती संभाजीनगर येथील भटक्या कुत्र्यांनी चावा घेण्याच्या आकडेवारी समोर आल्यानंतर काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये चिमुकल्यांना कुत्र्यांनी लक्ष केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याचे दिसून आले. दरम्यान, वर्ध्यातही भटक्या कुत्र्याची दहशत पाहायला मिळत असून आतापर्यंत भटक्या कुत्र्यांनी तब्बल 19 जणांना चावा घेतला आहे. भटक्या कुत्र्याने चावा घेतलेल्या जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून बसस्थानकासमोरील परिसरात कुत्र्याने काही जणांना चावा घेतल्याचे सांगितले जात आहे. कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या नागरिकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार होत असून 18 जणांवर उपचार झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. एका वृद्ध महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र यामुले भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून बंदोबस्ताची मागणी होत आहे. कुत्र्यांची दहशत रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. 

हेही वाचा : Wardha Accident : वर्ध्यात स्वातंत्र्यदिनाच्या आनंदावर विरजण! बाईकवरील ताबा सुटला अन् भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने 3 विद्यार्थिनींना चिरडलं

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number