Nashik Crime : भयंकर! लोखंडी पाईपने डोक्यावर, तोंडावर व ओठांवर वार, मुलानेच काढला वडिलांचा काटा

विठ्ठल तुकाराम गायकवाड (58) असे मृत वडिलांचे नाव असून, पोलिसांनी आरोपी मुलगा श्रीकृष्ण गायकवाड याला बेड्या ठोकल्या आहेत.<br/>
Nashik Crime : भयंकर! लोखंडी पाईपने डोक्यावर, तोंडावर व ओठांवर  वार, मुलानेच काढला वडिलांचा काटा

Nashik Crime: नांदगाव तालुक्यातील जातेगाव शिवारात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना समोर आली आहे. वडिलांच्या सततच्या त्रासाला आणि दारूच्या व्यसनाला कंटाळून पोटच्या मुलानेच लोखंडी पाईपने ठेचून वडिलांना संपवलं. विठ्ठल तुकाराम गायकवाड (58) असे मृत वडिलांचे नाव असून, पोलिसांनी आरोपी मुलगा श्रीकृष्ण गायकवाड याला बेड्या ठोकल्या आहेत.

असा उघड झाला थरार

सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास विठ्ठल गायकवाड यांचा मृतदेह त्यांच्या मळ्यातील खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्यांच्या डोक्यावर आणि तोंडावर गंभीर जखमा होत्या. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या मुलाच्या (श्रीकृष्ण) हालचालींवर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची धक्कादायक कबुली दिली.

हेही वाचा – Baba Ram Rahim on Parole : धक्कादायक! महिलांवर अत्याचार करणाऱ्या राम रहीमला पुन्हा 40 दिवसांचा पॅरोल

आरोपी श्रीकृष्णने पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीनुसार, त्याचे वडील विठ्ठल गायकवाड यांना दारूचे भीषण व्यसन होते. नशेत ते घरातील लोकांना वारंवार शिवीगाळ व मारहाण करत असत. धक्कादायक म्हणजे, दोन दिवसांपूर्वी वडिलांनी शेतात विजेच्या तारा लावून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप श्रीकृष्णने केला. वडील आपल्याला जिवंत ठेवणार नाहीत, या भीतीपोटी त्याने वडिलांना संपवण्याचा कट रचला.

हेही वाचा – लोखंडी रॉड, काठ्या, दगड…हातात जे सापडेल त्यानं हल्ला, नाशिकमध्ये टोळक्यांकडून हॉटेलची तोडफोड; मॅनेजर जखमी

साखरझोपेत असतानाच घातला घाला

दरम्यान, रविवारी रात्री साडेदहा वाजता वडील नेहमीप्रमाणे मळ्यातील खोलीत झोपायला गेले. रात्री साडेअकराच्या सुमारास श्रीकृष्ण घरातून चोरून बाहेर पडला आणि मळ्यात पोहोचला. वडील गाढ झोपेत असल्याचे पाहून त्याने लोखंडी पाईपने त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात विठ्ठल गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस कारवाई

या प्रकरणी मृताचे चुलत भाऊ जगन्नाथ गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी श्रीकृष्ण सध्या पोलीस कोठडीत असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या भीषण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version