Baramati Crime : लाखोंचा गैरव्यवहार, कोट्यवधींची फसवणूक जीव देण्यास उद्युक्त केले; न्यायासाठी बहीण न्यूयॉर्कहून बारामतीत धडकली! नेमकं प्रकरण काय?

बारामती तालुक्यातील फोंडवाडा गावात प्रॉपर्टीच्या वादातून खळबळ उडाली आहे. नातेवाईकांनी भावाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप त्याची बहीण धनश्री पिसाळ यांनी केला आहे.

Baramati Crime : लाखोंचा गैरव्यवहार, कोट्यवधींची फसवणूक जीव देण्यास उद्युक्त केले; न्यायासाठी बहीण न्यूयॉर्कहून बारामतीत धडकली! नेमकं प्रकरण काय?

बारामती तालुक्यातील फोंडवाडा गावात प्रॉपर्टीच्या वादातून खळबळ उडाली आहे. नातेवाईकांनी भावाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप त्याची बहीण धनश्री पिसाळ यांनी केला आहे. आत्महत्येपूर्वी भावाने केलेले व्हिडिओ आणि लिहिलेल्या चिठ्ठ्या पोलिसांनी तपासात का घेतल्या नाहीत, असा सवाल धनश्री पिसाळ यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या नावाने बनावट खाते तयार करून 32 लाखांचा गैरव्यवहार आणि संपूर्ण कुटुंबाची तब्बल 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप बहीण धनश्री पिसाळ हिने पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

हेही वाचा- Crime News : गुंता वाढला! टेकडीच्या पायथ्याशी बाईक, लॅपटॉप हिस्ट्रीत जीवन संपवण्याचे पर्याय सर्च; बेपत्ता IIT इंजिनिअरबाबत धक्कादायक खुलासे

तक्रारदार बहीण धनश्री पिसाळ म्हणाल्या की, "भावाला न्याय मिळावा म्हणून न्यूयॉर्कमधील नोकरी सोडून धनश्री पिसाळ थेट बारामतीत दाखल झाल्या आहेत. सुपे पोलिसांकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणात लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी धनश्री पिसाळ यांनी केली आहे."

पुढे धनश्री पिसाळ म्हणाल्या की, "कोट्यवधींची मालमत्ता, 32 लाखांचा कथित गैरव्यवहार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप.. या प्रकरणाचा तपास आता नेमका कोणत्या दिशेने जातो, सुपे पोलीस यामध्ये आता नेमका तपास कशा पद्धतीने करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.."

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number