Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरमध्ये स्फोट, तरी अलार्म वाजलाच नाही; अमरावती रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची धक्कादायक बाब समोर

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा झाला आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाचे मुदत संपूनही फायर ऑडिट झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरमध्ये स्फोट, तरी अलार्म वाजलाच नाही; अमरावती रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची धक्कादायक बाब समोर

अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या एसएनसीयूमध्ये अग्नितांडव प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि आग लागली यात तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात या रुग्णालयाचे फायर ऑडिटची मुदत 21 ऑगस्ट रोजी संपल्याची बाब पुढे आली आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागाच्या विद्युत विभागाला जुलै महिन्यात पत्र दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने अमरावती फायर सर्विस या एजन्सीला फायर ऑडिट करण्याची जबाबदारी देखील दिली होती.

दरम्यान अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा झाला आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाचे मुदत संपूनही फायर ऑडिट झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णालयातील एक्सपायर्ड फायर ऑडिट दुर्लक्ष झाल्यामुळे तीन निष्पाप बाळांचा मृत्यू झाला. 21 ऑगस्ट रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयातील फायर ऑडिटची मुदत संपली होती. तर व्हेंटिलेटरमध्ये स्पोट होऊनही अलार्म वाजला नाही ज्यामुळे ही भीषण घटना घडली. काळीज पिळवटणाऱ्या अपघाताने यंत्रनेच्या ढिसाळपनावर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.  

हेही वाचा- Jalgaon Accident : जळगावात विचित्र अपघात! टँकरच्या धडकेनंतर दुचाकीवरील तिघे चाकाखाली; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

अमरावतीतील रुग्णालय दुर्घटनेनंतर नाशिकमध्ये धक्कादायक माहिती समोर-
नाशिक शहरातील 687 रुग्णालयांपैकी तब्बल 195 रुग्णालयांचे फायर ऑडिटच झाले नसल्याचा खुलासा
संबंधित सर्व रुग्णालयांना मार्च महिन्यात नोटिसा बजावूनही कारवाई नाही
अमरावतीतील रुग्णालय दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
जिल्हा प्रशासनाकडून सर्व रुग्णालयांचे फायर, इलेक्ट्रिक आणि लिफ्ट ऑडिट करण्याचे आदेश
नियमांनुसार रुग्णालयांमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसवणे बंधनकारक
आगीची घटना घडल्यानंतरच ऑडिट करण्याऐवजी वर्षातून दोन वेळा फायर ऑडिट करणे अपेक्षित
मात्र अनेक रुग्णालयांकडून नियमांकडे दुर्लक्ष

हेही वाचा- Rahul Gandhi’s Letter to Devendra Fadnavis : “हे विद्यार्थी दान मागत नाहीत” आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून राहुल गांधींचं मुख्यमंत्र्यांना पत्र

विभागनिहाय स्थिती-
पूर्व-पश्चिम : 237 पैकी 41 ऑडिट बाकी
सातपूर : 58 पैकी 7 ऑडिट बाकी
नाशिक रोड : 96 पैकी 30 ऑडिट बाकी
सिडको : 168 पैकी 73 ऑडिट बाकी
पंचवटी : 128 पैकी 44 ऑडिट बाकी
एकूण : 687 पैकी 195 रुग्णालयांचे ऑडिट बाकी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number