Mumbai Navy Sailor Family : एकीकडे देशभर स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, तर मुंबईत नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांसह जीवन संपवलं; नेमकं काय घडलं?

मुंबईतील नेव्ही नगर परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. नेव्ही नगर परिसरात नौदलातील कर्मचाऱ्याने कुटुंबासह आत्महत्या केली आहे.

Mumbai Navy Sailor Family : एकीकडे देशभर स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, तर मुंबईत नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांसह जीवन संपवलं; नेमकं काय घडलं?

मुंबईतील नेव्ही नगर परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. नेव्ही नगर परिसरात नौदलातील कर्मचाऱ्याने कुटुंबासह आत्महत्या केली आहे. यावेळी मृत मुलांमध्ये दोन महिन्यांच्या बाळाचा आणि तीन वर्षांच्या मुलाचा समावेश होता. नौदल सैनिकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला तर पत्नीसह चिमुकल्यांची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

सैनिकाने पत्नीसह मुलांना विष दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. संपूर्ण देशात शनिवारी भारताचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात असताना दक्षिण मुंबईच्या कुलाबा परिसरात असणाऱ्या नेव्ही नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान मुंबईच्या नेवी नगर परिसरात नौदल सैनिकासह त्याची पत्नी आणि दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- Nalasopara Crime Cake Shop: नालासोपाऱ्यात 11 जणांना गंभीर विषबाधा! केक खाताना जे दिसलं त्याने सगळ्यांचीच खळबळ उडाली; नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, नौदलातील कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तावण्यात आला आहे. तर पत्नी आणि दोन्ही मुलांच्या मृत्यूचे कारण विषप्राशन असल्याचा प्राथमिक तपासात संशय आहे. यावेळी पोलिसांनी या चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले होते.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला आहे मात्र मृत्यू मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. या प्रकरणाचा पोलीस आणि भारतीय नौदलाकडून संयुक्तपणे तपास सुरू आहे. मृत्यूमागचं नेमकं कारण आणि घटनाक्रम शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number