Stray Dog News : 70 वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर जखमा, लहानांपासून मोठ्यापर्यंत 15 ते 17 जणांचे तोडले लचके; पिसाळलेल्या कुत्र्यामुळे परिसरात खळबळ

जयेश सावंत, प्रतिनिधी  श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घातलं आहे. बुधवारी सायंकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने एक दोन नाही, तर तब्बल 15 ते 17 जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिसाळलेल्या कुत्राने केलेल्या हल्ल्याचा थरार परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ओठ आणि कपाळाचा कुत्र्याने लचका तोडल्यामुळे 70 वर्षीय महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. तर इतर जखमींमध्ये लहान मुलांसह […]

Stray Dog News : 70 वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर जखमा, लहानांपासून मोठ्यापर्यंत 15 ते 17 जणांचे तोडले लचके; पिसाळलेल्या कुत्र्यामुळे परिसरात खळबळ

जयेश सावंत, प्रतिनिधी 

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घातलं आहे. बुधवारी सायंकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने एक दोन नाही, तर तब्बल 15 ते 17 जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिसाळलेल्या कुत्राने केलेल्या हल्ल्याचा थरार परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ओठ आणि कपाळाचा कुत्र्याने लचका तोडल्यामुळे 70 वर्षीय महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. तर इतर जखमींमध्ये लहान मुलांसह युवक आणि महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या जखमींवर अहिल्यानगर श्रीरामपूर आणि शिर्डी येथे उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये 70 वर्षीय वृद्ध महिलासह 14 वर्षीय साई मगर, 25 वर्षीय साक्ष गोरे,15 वर्षीय मतीन काझी, 32 वर्षीय सागर जोशी, 54 वर्षीय शारदा रेनिवाल, सविता साबळे यांचा समावेश आहे. दरम्यान, गावात फिरणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

हेही वाचा : Narendra Pawar : शस्त्राचा धाक दाखवून, दारू पाजून विवाहितेवर शारीरिक अत्याचार, भाजपच्या नरेंद्र पवारांवर गंभीर आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number