पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणेकरांना आता MH 12 ही पुण्याची ओळख आता पुसली जाणार आहे. कारण पुणे आरटीओ कार्यालयाने दिलेल्या 'MH61' या मालिकेच्या प्रस्तावाची अंमलबजावणी झाली असून पुण्यातील चारचाकी वाहनांना आता MH61 नंबरप्लेट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने आरटीओनं 'MH 12 1A' असा प्रस्तावही पाठवला होता.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तशी विनंतीही केली होती. त्यानंतर वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाने पुण्यासाठी 'MH 61' ही नवीन मालिका मंजूर केली असून, सोमवारी त्याबाबतची अधिसूचना जारी झाली. पुणेकरांचा जिव्हाळ्याचा म्हणजे, MH 12 पासिंग आहे, मात्र आता त्यांना 'MH61' ही नवी ओळख मिळणार आहे.
यावेळी वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन MH-57 ते MH-60 या सीरिजचं ही वाटप केलं आहे. यामध्ये MH 60 हे अहिल्यानगरमधील संगमनेर शहराला दिली आहे. यामुळे MH 61 चा मान हा आता पुण्याला मिळाला आहे. पुण्यात RTO ने 'MH12' पासिंगची मर्यादा संपवल्यामुळे चारचाकी वाहनांना MH61 A सीरिजपासून नंबर मिळणार आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार, दोन अक्षरांनंतर 3 अक्षरी मालिका म्हणजे MH 12 AAA असं काही सुरू करता येत नाही. त्याचसोबत तीन इंग्रजी अक्षरांची मालिका म्हणजे, MH 12 AAA 1234 अशी नंबरप्लेटही देता येत नाही. त्यामुळे हा प्रस्ताव मागे घेण्यात आला आणि MH61 असं देण्याचं निश्चित करण्यात आलं.