Goregaon Bus Fire : धुराचे लोट, प्रवाशांची पळापळ अन्…, गोरेगाव मेट्रो स्टेशनखाली बसला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच खळबळ

मुंबईतील गोरेगावच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव मेट्रो स्टेशनच्या अगदी खाली उभ्या असलेल्या एका बेस्ट बसला अचानक भीषण आग लागली.

Goregaon Bus Fire : धुराचे लोट, प्रवाशांची पळापळ अन्…, गोरेगाव मेट्रो स्टेशनखाली बसला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच खळबळ

मुंबईच्या गोरेगावमधून एक खळबळजनक बामती समोर आली आहे. मुंबईतील गोरेगावच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव मेट्रो स्टेशनच्या अगदी खाली उभ्या असलेल्या एका बेस्ट बसला अचानक भीषण आग लागली. यावेळी बसमधून धुराचे लोट बाहेर पडत होते, हे अत्यंत थरारक आणि भीतीदायक दृष्य पाहून तेथील प्रवासी आणि इतर लोक पळापळ करत होते.

हेही वाचा- IndiGo Flight : नशीब बलवत्तर म्हणून…! नवी मुंबईहून गेलेल्या IndiGo विमानाचा अपघात; लँडिंगदरम्यान प्रवाशांमध्ये एकच खळबळ

यावेळी संपूर्ण बेस्ट बस जळून खाक झाली आहे. ही घटना मेट्रो मार्गिका 7 वरील ओबेरॉय गार्डन सिटी स्टेशनच्या खाली घडली असून या घटनेमुळे मेट्रो स्थानकात काही काळ मोठा गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम वेगाने सुरू आहे.

दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव वाहने थांबवण्यात आल्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पोलीस आणि वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीचे लोळ आणि धुराचे प्रचंड लोट थेट वर असणाऱ्या मेट्रो स्टेशनमध्ये घुसल्याने परिसरात एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number