Solapur Crime : "हसू झालं गं माझं, जीव होता माझा…" सासरच्या जाचाला कंटाळून स्वत:ला संपवलं; पायलच्या तळहातावरील शेवटचे शब्द वाचून डोळे पाणावतील

सोलापूरात सासरच्यांना कंटाळून विवाहितेने आयुष्य संपवलं, तळहातावर लिहिलेले शेवटचे शब्द काय?

Solapur Crime : &quotहसू झालं गं माझं, जीव होता माझा…&quot सासरच्या जाचाला कंटाळून स्वत:ला संपवलं; पायलच्या तळहातावरील शेवटचे शब्द वाचून डोळे पाणावतील

फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची पुनरावृत्ती सोलापूरात झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर येथील माळशिरस तालुक्यातील पायल रणदिवे या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पायल ही 22 वर्षाची असून ती माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथे तिच्या सासरी राहत होती. तिला ब्युटी पार्लर सुरू करायचे होते. त्यासाठी तिने क्लास देखील पूर्ण केला होता. मात्र तिच्या सासरच्या लोकांना तिचं हे स्वप्न खटकत होत ज्यामुळे त्यांनी तिचा क्लास बंद केला. यामुळे ती काही काळ नैराश्यात होती. तिने तिच्या माहेरी आई-वडिलांकडे जाण्याचा विचार केला, मात्र सासर सोडून गेल्यावर आई वडिलांना नावं ठेवतील अशी भीती देखील तिच्या मनात होती. या सर्व गोष्टींनी असहाय्य झालेल्या पायलने अखेर तिच्या राहत्या घरी शनिवारी सायंकाळी आत्महत्या केली. पायल रणदिवे हिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हातावर मजकूर लिहला होता. यामध्ये तिने सासरच्या मंडळींनी आपला कसा छळ केला, हे सविस्तरपणे लिहले होते.

हेही वाचा- Dharashiv Accident : आठवड्यापूर्वी साखरपुडा झाला अन् नववधू-वरासोबत नियतीचा क्रुर खेळ; धाराशिवमध्ये Tata Nexon चा भीषण अपघात

पायलच्या हातावरील मजकूर काय?
यावेळी तिने आपल्या हातावर मजकूर लिहून आत्महत्या करण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. पायलने तळहातावर लिहिले की, "हसू झालं गं माझं… पार्लर बंद केलं जीव होता तो माझा, स्वप्न होतं ग… आजपर्यंत शांत बसले पण आता नाही… चांगल्या आई बापाची लेक आहे म्हणून निघून पण नाही गेले… माझ्यामुळे त्रास झाला त्यासाठी माफी मागते, सॉरी…" अशी तिच्या हातावर सुसाईड नोट आहे, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान पायलच्या वडिलांनी पोलिसांना फिर्याद देताना दावा केला की, पायलच्या अंगावर मारहाण केल्याच्या जखमांच्या खुणा आहेत. तसेच तिचे सासू-सासरे आणि पती यांच्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. तर पायलच्या दिराचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number