Jalgaon Crime News : संपत्तीच्या हव्यासापोटी भावजयीचा कुऱ्हाडीने वार करत निर्घृण खून, आरोपी दीराला जन्मठेपेची शिक्षा; न्यायलयाचा निकाल

जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनी येथे मिळकतीच्या वादातून भावजयीचा खून करणाऱ्या दीपक लोटन सोनार याला जिल्हा तसेच सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. योगीता सोनार यांचे पती मुकेश सोनार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर मिळालेल्या विम्याच्या रकमेसह घर आणि प्लॉटवरून दीपक सोनार तसेच अन्य नातेवाईकांचा योगीता व त्यांचा मुलगा आर्यन यांच्याशी वाद सुरू […]

Jalgaon Crime News : संपत्तीच्या हव्यासापोटी भावजयीचा कुऱ्हाडीने वार करत निर्घृण खून, आरोपी दीराला जन्मठेपेची शिक्षा; न्यायलयाचा निकाल

जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनी येथे मिळकतीच्या वादातून भावजयीचा खून करणाऱ्या दीपक लोटन सोनार याला जिल्हा तसेच सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. योगीता सोनार यांचे पती मुकेश सोनार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर मिळालेल्या विम्याच्या रकमेसह घर आणि प्लॉटवरून दीपक सोनार तसेच अन्य नातेवाईकांचा योगीता व त्यांचा मुलगा आर्यन यांच्याशी वाद सुरू होता. 21 मे 2021 रोजी रात्री याच कारणावरून वाद झाल्यानंतर दीपक सोनार याने योगीता यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. सरकार पक्षातर्फे 17 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी-पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दीपक सोनार याला दोषी ठरवत जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आईच्या खुनाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या आर्यन सोनारने न्यायालयाने निकाल देताच आईच्या आठवणीने हंबरडा फोडला.

हेही वाचा : Jalgaon Crime : नवरा-बायकोचा वाद विकोपाला! आईने गळा आवळला तर मुलाने डोक्यात सायकलचा पंप मारला; नेमकं प्रकरण काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number