Virar Crime News : विरारमध्ये पार्किंगच्या वादातून अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला; हातावरील चार नसांना दुखापत, रुग्णालयात उपचार सुरू

विरार : लोकलमधील किरकोळ वादातून 22 वर्षीय मयंकच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता आणखी एक चाकू हल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरार पूर्वेतील कारगिलनगर परिसरात वाहन पार्किंगच्या किरकोळ वादातून अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ल्याचे समोर आले आहे. शाब्दिक वादानंतर परिसरातील तीन तरुणांनी एका अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विरार […]

Virar Crime News : विरारमध्ये पार्किंगच्या वादातून अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला; हातावरील चार नसांना दुखापत, रुग्णालयात उपचार सुरू

विरार : लोकलमधील किरकोळ वादातून 22 वर्षीय मयंकच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता आणखी एक चाकू हल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरार पूर्वेतील कारगिलनगर परिसरात वाहन पार्किंगच्या किरकोळ वादातून अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ल्याचे समोर आले आहे. शाब्दिक वादानंतर परिसरातील तीन तरुणांनी एका अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारगिलनगर येथील महाकाली अपार्टमेंटमध्ये राहणारा 15 वर्षीय शाहिद रमजान शाह हा सुट्टीच्या दिवशी मनवेलपाडा रोडवरील सबवे परिसरात घड्याळे आणि चष्मे विकण्याचे काम करतो. सोमवारी रात्री कामावरून परतल्यानंतर तो आपली दुचाकी इमारतीखाली पार्क करत होता. यावेळी भुट्या, नयन आणि मयूर तेथे आले. वाहन पार्किंगवरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. वाद सुरू असताना भुट्याने शस्त्राने शाहिदवर हल्ला केला. या हल्ल्यात शाहिद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्यादरम्यान चाकूने वार करण्यात आला असून शाहिदच्या हातावरील चार नसा कापल्या गेल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, विरार पोलिसांनी भुट्या, नयन आणि मयूर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा : Mumbai Crime : मित्राकडून दोन चाकू घेतले, छातीवर आणि पोटावर सपासप वार, डोळ्यावर ठोसा; लोकलमध्ये काय घडलं?; आरोपीने सांगितलं जसंच्या तसं

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुंबई लोकलमध्ये अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यान मुसळधार पावसादरम्यान लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादावरून 22 वर्षीय मयंक लोहार याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. हा चाकू हल्ला करणाऱ्या आरोपी रोशन सुवर्णा याला मुंबई पोलिसांनी कुर्ला येथून अटक केली. लोकलमधील हत्येप्रकरणी पोलीस सूत्रांकडून आरोपीच्या जबाबातील तपशील समोर आली असून, आरोपी रोशन सुवर्णाने पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर आली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number