Chhatrapati Sambhajinagar Hospital Fire : आगीच्या तांडवातून वाचली, मात्र नियतीचा घाला टळला नाही! बालरुग्णालयातून बचावलेल्या जुळ्या बाळांनी पहाटे घेतला अखेरचा श्वास

छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमधील आगीतून वाचवलेल्या नवजात जुळ्या बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Hospital Fire : आगीच्या तांडवातून वाचली, मात्र नियतीचा घाला टळला नाही! बालरुग्णालयातून बचावलेल्या जुळ्या बाळांनी पहाटे घेतला अखेरचा श्वास

छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमधील आगीतून वाचवलेल्या नवजात जुळ्या बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शुक्रवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलच्या एनआयसीयूमध्ये आग लागल्याची घटना घडली. या आगीतून 9 बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं. या दोन्ही बाळावर घाटी रुग्णालयातील एन.आय.सी.युमध्ये उपचार देखील सुरू होते. दरम्यान आज पहाटे या बाळांचा मृत्यू झाला आहे. 

सकाळीच या बाळांनीही अखेरचा श्वास घेतला. दोन्ही बाळांचा जन्म होऊन त्यांना अवघे 25 आठवडे झाले होते. तर त्यांचं वजनही अत्यंत कमी होतं. एका बाळाचे एक किलो तर दुसऱ्या बाळाचे वजन केवळ सव्वा किलो इतके वजन होते. दोन्ही बाळांच्या फुफ्फुसांचा पूर्ण विकास न झाल्याने आणि ‘रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम’मुळे त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. आगीतून वाचवण्यात आलेल्या या दोन चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने हॉस्पिटलमधील आगीच्या घटनेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हेही वाचा- Gondia News: गोंदिया हादरलं! आमगावच्या दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना; 21 जखमी, 6 जण गंभीर

नेमकं काय घडलं होत?
छत्रपती संभाजीनगरातील एशियन हॉस्पिटलच्या बाल अतिदक्षता विभागाला म्हणजेच पीआयसीयूला शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. त्यावेळी पीआयसीयूमध्ये तब्बल 9 शिशूंवर उपचार सुरू होते. आग लागल्याचे लक्षात येताच रुग्णालय प्रशासन, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत सर्व 9 शिशूंना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी शिशूंना घाटी रुग्णालयासह शहरातील विविध खासगी रुग्णालयांत रुग्णवाहिकांमधून हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शिशूंची प्रकृती लक्षात घेऊन अत्यंत काळजीपूर्वक त्यांचे स्थलांतर करण्यात आले. डॉक्टर, कर्मचारी, रुग्णवाहिका चालक आणि पोलिसांच्या समन्वयातून राबविलेल्या तातडीच्या बचावकार्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र यातील दोन जुळ्या बाळांचा मृत्यू झाला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number