Washim : मुलीच्या लग्नाचा खर्च परवडला नाही! असहाय्य शेतकरी बापाने स्वतःच्या शेतात उचललं टोकाचं पाऊल

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील शेतकरी राजु कालापाड यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Washim : मुलीच्या लग्नाचा खर्च परवडला नाही! असहाय्य शेतकरी बापाने स्वतःच्या शेतात उचललं टोकाचं पाऊल

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील शेतकरी राजु कालापाड यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राजू कालापाड यांच्या मुलीचं लग्न 14 मार्च होणार होतं आज लग्न बस्त्याची खरेदी होणार होती मात्र पैश्याची जुळवा जुळव नं झाल्यानं आर्थिक विवंचनेतून राजू कालापाड यांनी आत्महत्या केल्याचं  गावाकऱ्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा- Pune Crime : संतापजनक! चार वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचं आमिष देत केल अमानुष कृत्य

राजू कालापाड यांच्याकडे अवघी एकर शेती आहे मात्र,गेल्या काही वर्षात अपेक्षित उत्पन्न शेतात नं झाल्यामुळे कर्जाचा डोंगर डोक्यावर वाढला होता. त्यामुळे राजू पत्नीसह पुण्यात मोलमजुरी साठी गेले होते.मात्र मुलीच्या लग्नासाठी काही दिवसांपासून ते गावी आले होते. आज सकाळी शेत जाऊन त्यांनी झाडाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. राजू यांना एक मुलगी आणि दोन लहान मुलं आहेत. अवघ्या एका महिन्यावर मुलीचे लग्न आले होते. त्या पूर्वीच त्यांनी आत्महत्या केल्यानं गावकर्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number