Ashok Kharat Case : लैंगिक शोषणापलीकडेही खराचे अनेक कारनामे! बँकेत केला होता मोठा घोटाळा; बँक मॅनेजरने दिली कबुली

खरातच्या चौकशीदरम्यान दररोज नवीन काही तरी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातच खरातने केवळ श्रद्धेच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली नाही तर त्याने अनेक मोठे व्यवहारीक गंडे देखील घातले आहेत.

Ashok Kharat Case : लैंगिक शोषणापलीकडेही खराचे अनेक कारनामे! बँकेत केला होता मोठा घोटाळा; बँक मॅनेजरने दिली कबुली

नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाब अशोक खरात हा सध्या 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत असून त्याच्या विरोधात एसआयटीकडून चौकशी देखील सुरु आहे. धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातचे स्वतःचे’भविष्य’ सध्या अंधारात आहे. खरातच्या चौकशीदरम्यान दररोज नवीन काही तरी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातच खरातने केवळ श्रद्धेच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली नाही तर त्याने अनेक मोठे व्यवहारीक गंडे देखील घातले आहेत. अशातच अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांचे प्रकरण समोर आले आहे. स्वतःच्या ओळखीचा वापर करून अशोक खरातने शिर्डीतील राहाता येथील समता पतसंस्थेत 100 तर सिन्नरच्या कुंदेवाडी येथील जगदंबा पतसंस्थेत 32 खाती उघडली होती. धक्कादायक म्हणजे, जगदंबा पतसंस्थेत ज्यांच्या नावाने खरातने खाते उघडले होते त्यांचा खातेदाराशी कधी संबंधच आला नव्हता अशी माहिती जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी शिर्डी पोलिसांना चौकशीदरम्यान दिली. 

हेही वाचा- Rohit Pawar On Ashok Kharat: ‘हवाला, दुबई कनेक्शन अन् भ्रष्ट नेते…’; खरात प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
या दोन्ही खात्यामध्ये अशोक खरातने कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला. यावेळी जगदंबा बँकमध्ये खरातकडून 32 खात्यांमध्ये 2 कोटी 74 लाख रुपयांचे व्यवहार करण्यात आला होता. तर सर्व 32 खात्यांना अशोक खरात नॉमिनी होता. अशोक खरात याने स्वतः सगळी कागदपत्र देऊन खाती उघडली होती. मात्र ज्यांच्या नावाने खाती उघडली गेली, त्यांचा आणि पतसंस्थेचा कधीच प्रत्यक्ष संबंध आला नाही. अशोक खरात यानेच पैसे टाकले आणि कालांतराने काढून घेतले होते.

दरम्यान जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर हे कबुली देत म्हणाले की, “हे जे अकाऊंट आहे ते एका दिवशी उघडलेल अकाऊंट नाही. अशा दोन-चार दिवसाला उघडलेल अकाऊंट आहे आणि खरातांनी ती जबाबदारी घेतली होती की, सर्व डॉक्युमेंट मी क्लिअर करून देईन म्हणून… आणि त्यात जी नाव आहेत त्या लोकांशी आमचा प्रत्यक्ष संबंध आलेला नाही. खातेदार उपस्थितीत नसताना पैसे काढले गेले. ही माझी ओळखीतून चूक झाली, ती माझ्याकडून झालेली टेकनिकल चूक आहे. खरातची त्यावेळेस ओळख होती त्यामुळे मी अशोक खरातच्या ओळखीतून व्यवहार झाला म्हणून त्याच्या प्रभावाखाली येऊन माझ्याकडून चूक झाली.” 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number