Hingoli Crime News : भयंकर! बिस्किट आणि पैशाचं आमिष देत अल्पवयीन मुलीवर चार नराधमांचा अत्याचार; तिघे ताब्यात, एकाचा शोध सुरू

हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील एका गावामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका तेरा वर्षीय गतीमंद भोळसर चिमुकलीवर गावातील चार जणांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. अल्पवयीन चिमुकलीचे कुटुंबीय घरी नसताना चिमुकलीच्या भोळेपणाचा गैरफायदा घेत तिला बिस्किटे आणि पन्नास रुपये देण्याचे आमिष दाखवत तिघा जणांकडून दुचाकीवर बसून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. तर […]

Hingoli Crime News : भयंकर! बिस्किट आणि पैशाचं आमिष देत अल्पवयीन मुलीवर चार नराधमांचा अत्याचार; तिघे ताब्यात, एकाचा शोध सुरू

हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील एका गावामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका तेरा वर्षीय गतीमंद भोळसर चिमुकलीवर गावातील चार जणांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. अल्पवयीन चिमुकलीचे कुटुंबीय घरी नसताना चिमुकलीच्या भोळेपणाचा गैरफायदा घेत तिला बिस्किटे आणि पन्नास रुपये देण्याचे आमिष दाखवत तिघा जणांकडून दुचाकीवर बसून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. तर यापूर्वी देखील एका आरोपीने अशाच प्रकारे बिस्किट देऊन चिमुकलीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. हे चारही नराधम आरोपी त्याच गावातील रहिवासी आहेत. ही घटना समोर आल्यानंतर सुन्न झालेल्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली.

हेही वाचा : Abhijeet Dipke: 'तुम्ही 10 वर्षात केलं काय?'; सरकारी शाळांची अवस्था पाहून अभिजीत दीपकेंनी केली 'या' मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

याप्रकरणी चारही आरोपींविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चार नराधमांपैकी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर चौथ्या आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भ्रमणध्वनीवरून पीडित कुटुंबीयांच्या आईशी संवाद साधला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number