5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी

मुंबई: मागील 5 वर्षांमध्ये बेस्टच्या बस अपघातांची संख्या 834 इतकी पोहचली असून, यामध्ये एकूण 88 जीवितहानी झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. या अपघातांमध्ये मरणं आणि जखमी नागरिकांना एकूण 42.40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई दिली गेली आहे. तसेच, 14 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे आणि 24 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या सर्व माहितीचा खुलासा आरटीआय […]

5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी

मुंबई: मागील 5 वर्षांमध्ये बेस्टच्या बस अपघातांची संख्या 834 इतकी पोहचली असून, यामध्ये एकूण 88 जीवितहानी झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. या अपघातांमध्ये मरणं आणि जखमी नागरिकांना एकूण 42.40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई दिली गेली आहे. तसेच, 14 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे आणि 24 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या सर्व माहितीचा खुलासा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट प्रशासनाकडून प्राप्त केला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागील पाच वर्षांतील बस अपघातांच्या, जीवितहानीच्या, तसेच आर्थिक नुकसानभरपाईच्या बाबींबाबत माहिती मागितली होती. या संदर्भात बेस्टचे वरिष्ठ वाहतूक अधिकारी ईगाल बेंजामिन यांनी सविस्तर माहिती दिली.
 

मागील ५ वर्षांत बेस्टच्या 352 अपघातांमध्ये 51 जीवितहानी झाली आहे, तर खाजगी कंत्राटदारांकडून 482 अपघात झाले आहेत ज्यामध्ये 37 जीवितहानी झाली आहे. विशेषत: वर्ष 2022-23 आणि 2023-24 मध्ये प्रत्येक वर्षी 21 जीवितहानीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

आर्थिक नुकसानभरपाई
मरणं आणि जखमी नागरिकांना दिलेल्या 42.40 कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसानभरपाईमध्ये सर्वाधिक रक्कम वर्ष 2022-23 मध्ये देण्यात आली. त्या वर्षी 107 प्रकरणांमध्ये एकूण 12.40 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली. यापूर्वी, वर्ष 20219-20 मध्ये 9.55 कोटी,2020-21  मध्ये 3.44 कोटी, 2021-22  मध्ये 9.45 कोटी आणि 2023-24 मध्ये 7.54 कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून दिले गेले.

कर्मचारी विरोधी कारवाई
मागील 5 वर्षांत बेस्ट प्रशासनाने प्राणतंकी अपघातांमध्ये 12 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे, तर वैयक्तिक इजा प्रकरणांमध्ये २ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. 24 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, अन्य कारवाईत ताकीद, समज, सक्त ताकीद आणि वसुली करणे यांचा समावेश आहे.

प्रशासनाच्या सुरक्षिततेची जबाबदारी
अनिल गलगली यांनी या आकडेवारीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, बेस्ट प्रशासन आणि कर्मचाऱ्यांकडून अधिक खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही आकडेवारी बेस्ट प्रशासनाच्या सुरक्षिततेच्या जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करते. सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक उपाययोजना घेणे आवश्यक आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number