अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. मुंबई पुणे जुन्‍या महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात खाजगी बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर, मृतांचा आखडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई पुणे जुन्या […]

अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. मुंबई पुणे जुन्‍या महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात खाजगी बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर, मृतांचा आखडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे.

मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेतील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच, अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांशी मुख्यमंत्री यांनी चर्चा केली. आणि या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे त्यांनी कौतुक केले.

तर, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही ट्विट करत अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोरघाटात खासगी बस दरीत कोसळून प्रवासी मृत्यू पावल्याची घटना दुर्दैवी,वेदनादायक आहे. घटनेतील जखमींना तत्काळ उपचार मिळून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी,ही प्रार्थना.मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली!त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
असे ट्विट अजित पवार यांनी बोरघाटातील अपघातांवर केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number