अमरावती, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.०१ टक्के मतदान झाले आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ४५.९५ टक्के मतदान झाले. हिंगोली लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी ४०.५० टक्के मतदान झाले.
लोकसभा निवडणूक दुपारी ३ पर्यंतची मतदानाची टक्केवारी – महाराष्ट्र
वर्धा ४५.९५ टक्के
अकोला ४२.६९ टक्के
अमरावती ४३.७६ टक्के
बुलढाणा ४१.६६ टक्के
हिंगोली ४०.५० टक्के
नांदेड ४२.४२ टक्के
परभणी ४४.४९ टक्के
यवतमाळ – वाशिम ४२.५५ टक्के
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.