नवी दिल्ली, २३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अचानक आजारी पडलेले काँग्रेस नेते राहुल गांधी अचानक बरे झाले आहेत. ते बुधवार २४ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत. याआधी राहुल रविवारी २१ एप्रिल रोजी अचानक आजारी पडले. त्यांच्या आजाराबाबत सविस्तर माहिती काँग्रेसकडून देण्यात आली नाही. जयराम रमेश यांनी ट्वीट करून राहुल आजारी असल्यामुळे त्यांचे प्रचार दौरे रद्द केल्याचे सांगितले. यानंतर मंगळवारी २३ एप्रिलला जयराम रमेश यांनी ट्वीट करून राहुल बरे झाल्याचे तसेच बुधवार २४ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार असल्याचे सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.