लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी :  लोकसभा निवडणुकीची आचारसहिंता लागू होताच छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण पोलीसांनी कडक बंदोबस्तासह राजकीय पक्षांचे होर्डिग्ज, बँनर्स,जाहिरातीवर कारवाई करीत ते काढून घेण्यात आले. धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर चेकपोस्ट लावून वाहनांची कसून झडती घेण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट चलनी नोटा, देशी-विदेशी मद्य व हत्यारे आदींची तस्करी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता गृहीत धरुन खबरदारीचा उपाय  म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक मनीष कालवणिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version