लातूर, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : लातूर – सोलापूर महामार्गावर औसा येथे एक वेगाने आलेली गाडी थेट हॉटेलात घुसली. या अपघातात गाडीमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर रस्त्यालागत असणाऱ्या हॉटेलच्या आवारात उभ्या असलेल्या तरुणाचे दोन्ही पाय मोडले. तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे अपघातातील मृतांची संख्या तीन झाली. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.