मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी ८ मार्चला

मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी ८ मार्चला

प्रतिनिधी, मुंबई, दि. ०७ मार्च २०२४ : गेले अनेक दिवस मराठा आरक्षण या विषयाने सम्पूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ८ मार्च रोजी सुनावणी ठेवली आहे. याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती उच्च न्यायालयाला बुधवारी केली. त्यावर याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करू नका, असे न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने म्हटले. मात्र, सदावर्ते यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version