इंदापूर, ९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. ‘मंडल आयोगाची लढाई तुम्ही लढला. आमच्यासाठी मैदानात उतरून आम्हाला आरक्षण मिळवून दिलं. आता ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलं आहे. तुम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढं आलं पाहिजे, अशी सादच छगन भुजबळ यांनी प्रकाश आंबेडकर यांना घातली आहे. इंदापूर येथील ओबीसी एल्गार परिषदेतून भुजबळ यांनी ही साद घातली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.