नाशिक, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. उध्दव ठाकरे हे महाराष्ट्रावरचे संकट होते. ऐन कोरोना संकटात मुख्यमंत्री घरात बसून होते. अडीच वर्ष ते घरात बसून होते. महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडले होते. या संकटावर उपाय म्हणून हनुमान चालीसा आवश्यक होती, असे नवनीत राणा म्हणाल्या.
महाराष्ट्रात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. पण हे विषय घेऊन सध्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणे शक्य आहे. केंद्र आणि राज्य सरकाने या संकटावर उपाय करावा आणि लवकर मदत करावी, ही मागणी आहे. सरकार हे उपाय करेल, असा विश्वास पण वाटत आहे, असे नवनीत राणा यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.