जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडून पुन्हा इतिहासाची उजळणी करण्यात आली.
शिवराय मुस्लिमविरोधी होते हा गैरसमज, रयतेचा शत्रू म्हणून अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला असं पवारांनी म्हटले.
शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते, शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं रंगवला गेला, असं वक्तव्य पवारांनी केले.
पुण्यात श्रीमंत कोकाटे लिखित सचित्र शिवचरित्राचं प्रकाशन झालं, त्यावेळी बालगंधर्व रंगमंदिरात पवार बोलत होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.