मुंबई : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचालींना वेग आल्याची चर्चा रंगू लागली आहे. अजित पवार गटातील तब्बल 22 आमदारांनी गुप्तपणे ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या सत्तासमीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले असून, राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार गटातील काही आमदारांनी गुप्तपणे ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटातील काही आमदार पक्षाच्या भविष्यातील राजकीय दिशा, आगामी निवडणुकीची रणनीती आणि स्थानिक पातळीवरील बदलत्या समीकरणांबाबत साशंक असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर काही आमदारांनी थेट शरद पवारांशी संवाद साधल्याची चर्चा आहे. या घडामोडींना आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे ते म्हणजे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीही शरद पवारांची भेट घेतल्याच्या चर्चेमुळे. पक्षातील वाढती अस्वस्थता आणि आमदारांच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष राजकीय महत्त्व दिलं जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.