Pune Crime : पुण्यातील भारती विद्यापीठात शिकणाऱ्या 21 वर्षीय डॉक्टर तरुणीचा मृत्यू; नवव्या मजल्यावरून मारली उडी, पोलिसांकडून तपास सुरू

पुणे : पुण्यातील कात्रज परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीचा इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माया रेड्डी असं मृत तरुणीचं नाव आहे. माया रेड्डी ही भारती विद्यापीठात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती, अशी माहिती समोर आली आहे. माया ही मूळची […]

Pune Crime : पुण्यातील भारती विद्यापीठात शिकणाऱ्या 21 वर्षीय डॉक्टर तरुणीचा मृत्यू; नवव्या मजल्यावरून मारली उडी, पोलिसांकडून तपास सुरू

पुणे : पुण्यातील कात्रज परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीचा इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माया रेड्डी असं मृत तरुणीचं नाव आहे. माया रेड्डी ही भारती विद्यापीठात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती, अशी माहिती समोर आली आहे. माया ही मूळची हैदराबाद येथील असल्याची माहिती आहे. शिक्षणासाठी ती पुण्यात राहत होती. कात्रज परिसरातील एका सोसायटीमध्ये ती राहत होती.

हेही वाचा : Pune Crime : आर्थिक विवंचनेतून MPSC ची परिक्षा देणाऱ्या तरुणाने गळफास घेत संपवलं जीवन; पोलिसांच्या हाती लागली शेवटची चिठ्ठी

आज दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास माया रेड्डी हिने राहत्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरून खाली उडी मारल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. माया रेड्डीने हे टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणातून उचललं, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. अभ्यासाचा ताण होता का, अथवा यामागे अन्य काही कारण आहे का, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे भारती विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. भारती विद्यापीठ, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number